वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पूर्वीहूनि बहु भक्त

🙏 3. संत तुकाराम · ABH-080807 · अभंग क्र. ३०३४

3034.
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाही अव्हेरिले दास कोणी ॥१॥
जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥धृपद॥
मिरवे चरणी ब्रिद ऐसीये गोष्टीचे । भक्तासांभाळाचे प्रेम ऐसे ॥२॥
तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
देवा पूर्वीपासूनच तू खूप भक्तांचा सांभाळ केला आहेस तुला शरण आलेल्या दासांचा तू कधी अव्हेर केला नाहीस. हे विठ्ठला जे जे भक्त तुला शरण आले आहेत त्यांचा त्यांचा तू सर्वाचा स्वीकार केला आहेस अशी किर्ती पोवाडे तुझी सर्वत्र आहेत. तू भक्तांविषयी फार प्रेमळ आहेस आणि भक्तांचे सांभाळ देखील तू करतोस अशी ब्रीदावळीच तू तुझ्या पायामधे मिरवत असतोस. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा माझ्या मायबापा तू आम्हा भक्तांसाठीच नामरुपाला येत असतोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग