गुंतलासी मायापाशी ।
3038.
गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥
वाचे सदा नाम गाय । तेणे चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखी वदता ॥२॥
बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एका जनार्दनी आवडी । रामनामी धरिता ॥३॥
