रात्रंदिवस भार वाहे
3027.
रात्रंदिवस भार वाहे खरा । बाइलेंचें उदर भरितसे ॥१॥
नेणे दानधर्म व्रत आचरण । अतिथी पूजन स्वप्नी नाही ॥२॥
नेणे श्राद्ध पक्ष आपुला आचार । सदा दुराचारी कर्मे करी ॥३॥
पत्नी गृहीं सदा वसवसे मन । न वेंची काही धन कवडी धन ॥४॥
एका जनार्दनी ऐसा हीनभागी । जोडीतसे अभागी नरकवास ॥५॥
