सलगीनें सर्प हाती तो
3057.
सलगीनें सर्प हाती तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा ॥१॥
तैसे विषयासी सलगी पै देता । नेती अधःपाता प्राणिमात्र ॥२॥
विष उत्तम चांगलें घातलेंसे मुखी । परि राण शोखी क्षनमात्रें ॥३॥
जाणोनी जाणोनीं नको भुलूं वाया । एका जनार्दनी पाया भजे आधी ॥४॥
