देह भोगितसे मुख्य गो
3014.
देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥
स्त्री हाती देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥
जे जे आणि ते ते थोडे । धनधान्य आवडे कुडे ॥३॥
ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्यांयशीं वेरझारा ॥४॥
सोडविता नाही कोण्ही । एका जनार्दनावांचुनी ॥५॥
