स्त्रियांचे सगतीं ।
3031.
स्त्रियांचे सगतीं । नोहें परमार्थ निश्चिती ॥१॥
स्वप्नीं होता दरुशन । तेथेंच गुंततसे मन ॥२॥
पहा स्त्रियांच्या अंगसंगे । भुलविला ऋषिश्रृंग ॥३॥
विश्वामित्र तपिया खाणी । कुत्रा करूनी हिंडे वनी ॥४॥
ऐसे भुलले थोर थोर । तेथे जीव किती पामर ॥५॥
एका जनार्दनी भुलले । वाया स्त्रीसंगीं गुंतले ॥६॥
