धनलोभ्याचें जाय धन ।
3047.
धनलोभ्याचें जाय धन । शोधितसे रात्रंदिन ॥१॥
त्याची निंदा करतील लोक । रांडा पोरे थुंकती देख ॥२॥
भिकेलागीं जेथे गेला । म्हणती काळतोंडी आला ॥३॥
हाता धनलोभें भुलला । संचित ते बरा नागविला ॥४॥
ऐसे धनाचे कारण । शरण एका जनार्दन ॥५॥
