वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पावलो पंढरी वैकुंठभव

🙏 3. संत तुकाराम · ABH-080830 · अभंग क्र. ३०४१

3041.
पावलो पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलो पंढरी आनंदगजरे । वाजतील तुरे शंख भेरी ॥धृपद॥
पावलो पंढरी क्षेमआळींगनी । संत या सज्जनी निवविलो ॥२॥
पावलो पंढरी पार नाही सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलो पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलो पंढरी आपुले माहेर । नाही संवसार तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
मी आज भूवैकुंठ म्हणजे पंढरीला आलो आहे त्यामुळे आजचा दिवस धन्य आहे व सोन्याचा आहे. मी आज पंढरीमध्ये हरीनामाचा गजर करीत तसेच शंख नगारे तुतारे टाळ वीणाच्या गजरामध्ये आनंदाने पंढरीत आलो आहे. मी पंढरीत आल्यानंतर संत सज्जनाने मला क्षेम आलिंगन दिले व मला निश्चिंत केले. आता पंढरीला आल्यानंतर माझ्या सुखाला अंत:पारच राहीला नाही कारण माझा सखा मायबाप पाडूरंग मला भेटला. मी ज्यावेळी पंढरीक्षेत्रामध्ये आलो त्यावेळीच माझी जन्ममरणाची येरझार खुंटली आणि विठाबाई माऊलीने मला तिचा प्रेमपान्हा दिला. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी मी पंढरीक्षेत्रामध्ये आलो त्यावेळी माझ्या माहेरीच मी आलो त्यामुळे आता मला संसारच राहीलेला नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग