वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आजामेळा अंत मरणासी आ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080577 · अभंग क्र. ३०३६

3036.
आजामेळा अंत मरणासी आला । तोवरी स्मरला नाही तुज ॥१॥
प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविले ॥धृपद॥
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
तुका म्हणे भक्तकाज तू कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥

अर्थ :
अजामेळ शेवटी मरणापर्यंत आला परंतू तरी देखील त्याने तुझे स्मरण केले नाही. देवा प्राण जात्यावेळी त्याने मुलाच्या निमित्ताने नारायणा असे नाम उच्चारले तर तू त्याच्यासाठी विमानच पाठवले. हे जगन्नाथा, सर्व समर्था तू त्रैलोक्याचा सोयरा आहेस भक्तांविषयी तू फारच कृपाळू होतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू भक्तराज आहेस भक्तांचा तू कैवारी आहेस असे तुझे वर्णन साही शास्त्र आणि चारही वेद वर्णन करुन सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग