वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तू आम्हा सोयरा सज्जन

🙏 3. संत तुकाराम · ABH-080791 · अभंग क्र. ३०४३

3043.
तू आम्हा सोयरा सज्जन सांगाति । तुज मज प्रीति चालो सदा ॥१॥
तू माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरीचा ॥धृपद॥
गण गोत मित्र तू माझे जीवन । अनन्य शरण तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥

अर्थ :
देवा तू आमचा सोयरा सज्जन सोबती आहेस आपल्या दोघामध्ये प्रीती नेहमी असू दयावी. देवा तू माझा जिव्हाळा आहेस जिवाचा जिवलग आहेस माझ्या अंत:करणातील तू अंतरंग आहे. देवा तूच माझा गणगोत मित्र आणि तूच माझे जीवन आहेस. मी तुझ्या पायी अनन्यभावाने शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सर्व गुणाने मी तुझा दास आहे आणि नेहमी तुझाच अभ्यास करत राहाणे हेच मला आवडते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग