बाइलेच्या बोला । धरी
3023.
बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥१॥
बाइलेसी नेसवी धट्टी । माते न मिळे लंगोटीं ॥२॥
बाइलें षड्रास भोजन । माते न मिळे कोरान्न ॥३॥
बाईल बैसवी आपुलें घरी । माते हिंडवी दारोदारीं ॥४॥
एका जनार्दनी शरण । ऐसे पुत्राचें अवगुण ॥५॥
