वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पाषाण प्रतिमा सोन्या

🙏 3. संत तुकाराम · ABH-080578 · अभंग क्र. ३०२०

3020.
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हे तो हाती एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हाती समर्थाचा सिक्का । न मानिता लोका येईल कळो ॥२॥
तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावे ॥३॥

अर्थ :
पाषाणाची मूर्ती तयार केली जाते विष्णूची मूर्ती तयार झाली की तिला सोन्याच्या पादूका बसवल्या जातात परंतू जेवढे सामर्थ्य मूर्तीच्या ठिकाणी आहे तेवढे सामर्थ्य पादूकाच्या ठिकाणी नसते कारण वेद हा एक समर्थ आहे की जो पाषाणामध्येही देवत्व आणत असतो व मंत्रोपचारानेच पाषाणाच्या ठिकाणी देवत्व येते. एखादया अंत्यज व्यक्तीच्या हातामध्ये राजाचा शिक्का मुद्रीत करुन कागद जरी दिला तरी लोकांना तो मान्य करावा लागतो अन्यथा मान्य केला नाही तर त्याचे दुष्परिणाम लोकांना कळून येईल. तुकाराम महाराज म्हणतात येथे याविषयी दुराग्रह धरणे हे खोटे ठरते व्यर्थ ठरते त्यामुळे आपआपल्या संचिताला शरण जावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग