मायबापा न घाली अन्न
3019.
मायबापा न घाली अन्न । बाईलेच्या गोता संतर्पण ॥१॥
मायबापा नसे लंगोटी । बाइलेच्या गोता नेसवी धट्टी ॥२॥
मायबापान मिळे गुंजभर सोने । बाइलेच्या गोता उडी अळंकार लेणें ॥३॥
मायबापें श्रमोनियां मेलीं । एका जनार्दनी बाईल प्रिय जाहली ॥४॥
