भेटीवांचोनिया दुजे न
3051.
भेटीवांचोनिया दुजे नाही चित्ती । येणे काकुलती याजसाठी ॥१॥
भेटोनिया बोले आवडीचे गुज । आनंदाच्या भोजे जेवू संगे ॥धृपद॥
मायलेकरासी नाही दुजी परि । जेऊ बरोबरी बैसोनिया ॥२॥
तुका म्हणे ऐसे अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित नारायणा ॥३॥
अर्थ :
माझ्या चित्तामध्ये तुझ्या भेटीवाचून दुसरे काहीच नाही त्यामुळे तर देवा तुला सारखे काकूळतीला यावे लागते. देवा तू मला एकदा भेट मग आपण दोघेही भेटलो की आवडीने गुज गुह्य गोष्टी करु व आनंदाने एकत्र बसून भोजन सेवन करु. देवा मायलेकरांमध्ये दुजाभाव नसतो त्याप्रमाणे आपण दोघेही मायलेकरेच आहोत त्यामुळे आपण दोघेही भेटलो की बरोबरीनेच बसून दोघेही एकत्र जेवू. तुकाराम महाराज म्हणतात, अहो नारायणा अशी आर्त इच्छा माझ्या मनात आहे व त्यामुळे तुम्ही त्वरीत यावे.
