वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

बरवी हे वेळ सांपडली

🙏 3. संत तुकाराम · ABH-080710 · अभंग क्र. ३०१४

3014.
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥
येणे पंथे माझी चालिली पाउले । दरुषण झाले संता पायी ॥धृपद॥
त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड । त्याचि काळे पिंड पुनीत झाला ॥२॥
तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥

अर्थ :
आज ही वेळ फार चांगली मिळाली आहे कारण माझ्या पूर्वसंचिताला बुध्दी साहाय्य झाली आहे. माझी बुध्दी मला साहाय्य झाली त्यामुळे मी परमार्थाच्या मार्गाने चालत आलो व त्या निमित्ताने मला संतांच्या पावलांचे दर्शन झाले. ज्या दारिद्रयाने ज्या दोषाने मला त्रास दिला त्याचा आता खंड झाला असून त्यावेळी माझा देह देखील पुनीत म्हणजे पुण्यवंत झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझा सर्व व्यवहारच सरला असून माझी जन्ममरणरुपी येरझार फळाला आली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग