घरी धनधान्य पुरून ।
3044.
घरी धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥
द्रव्य असोनी नाही म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥
असोनि द्रव्याचिया राशी । भिक्षा मागे अहर्निशी ॥३॥
ऐसा संचय करुन । सवेंची पावल मरण ॥४॥
वाया गेला नरदेहीं । एका जनार्दनी पाही ॥५॥
