वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आजिवरी होतो संसाराचे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080533 · अभंग क्र. ३०२३

3023.
आजिवरी होतो संसाराचे हाती । आता ऐसे चित्ती उपजले ॥१॥
तुला शरणागत व्हावे नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥धृपद॥
विसरलो काम याजसाठी धंदा । सकळ गोविंदा माझे तुझे ॥२॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवी झाली तैसी ॥३॥

अर्थ :
आतापर्यंत मी संसाराच्या हाती होतो परंतू आता माझ्या चित्तात असे आले आहे, की हे नारायणा तुम्हाला शरण यावे त्यामुळे आपल्या दीनभक्ताचा तुम्ही अंगीकार करावा. हे गोविंदा मी तुझ्यासाठी माझा सर्व कामधंदा आणि माझे तुझे ही भावना देखील विसरलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या जीवाला जी तुम्हाला शरण येण्याची आवड निर्माण झाली आहे ती माझी विनंती तुम्ही मान्य करावी.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग