वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अनाथ परदेशी हीन दीन

🙏 3. संत तुकाराम · ABH-080912 · अभंग क्र. ३०४०

3040.
अनाथ परदेशी हीन दीन भोळे । उगलेंचि लोळे तुझे रंगी ॥१॥
आपुले म्हणावे मज नुपेक्षावे । प्रेमसुख द्यावे मायबापा ॥धृपद॥
कासवीचे परि दृष्टी पाहे मज । विज्ञानी उमज देवुनिया ॥२॥
तुका म्हणे तुझा झालो शरणागत । काया वाचा चित्त दुजे नाही ॥३॥

अर्थ :
मी अनाथ परदेशी हीन दीन भोळा भक्त आहे उगाचच तुझ्या रंगामध्ये देवा मी लोळत आहे. त्यामुळे हे मायबापा मी कसाही असलो तरी देखील तू मला आपले म्हण माझी उपेक्षा करु नकोस आणि तुझे प्रेमसुख तू मला दयावे. देवा तू कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे माझ्याकडे पाहावे व माझी भूक तृप्त करावी आणि तुझा प्रत्येक साक्षात्कार मला येऊ दयावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला शरण आलो आहे आणि माझ्या कायावाचामनामध्ये तुझ्यावाचून दुसरे काहीच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग