वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

मोलाचे आयुष्य वेचुनि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080817 · अभंग क्र. ३०५४

3054.
मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥१॥
अनंतजन्मींचा शेवट पाहता । नर देह हाता आला तुझ्या ॥धृपद॥
कराल ते जोडी येईल कार्‍यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागी ॥२॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
करा हरीभक्ती परलोकी कामा । सोडवील यमापासोनिया ॥४॥
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल । नका वेचू बोल नामेविण ॥५॥

अर्थ :
अरे तुमचे एवढे मोठे मोलाचे आयुष्य व्यर्थच वाया जात आहे खूप पूर्वपुण्य चांगले असेल तरच हे मोलाचे आयुष्य मिळते. अरे अनंत जन्माच्या शेवटी तुझ्या हाती हा नरदेह आला आहे. अहो या नरदेहामध्ये जे जे जे चांगले कार्य तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल ते पूर्ण होतील आणि सुखाची प्राप्ती करुन घ्यायची असेल तर विठ्ठलाचे चिंतन नेहमी करत राहावे. ज्याप्रमाणे धनाची साठवण करुन ठेवल्यानंतर खूप धन एकत्रित होते त्याप्रमाणे थोडी थोडी भक्ती करा व नारायणाची प्राप्ती तुम्ही करुन घ्यावी. या नरदेहामध्ये तुम्ही आला आहात तर हरीभक्ती करत राहा ती हरीभक्ती तुम्हाला परलोकात कामाला येईल व यमापासून सोडवील. तुकाराम महाराज म्हणतात, अहो लोकहो तुम्हाला मोठया कष्टाने हे आयुष्यरुपी मोल मिळाले आहे तरी तुम्ही या नरदेहामध्ये हरीनामावाचून व्यर्थ कोणत्याही प्रकारचे बोल बोलू नका.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग