वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

दसरा दिवाळी तोचि आम्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080508 · अभंग क्र. ३०५९

3059.
दसरा दिवाळी तोचि आम्हा सन । सखे संतजन भेटतील ॥१॥
आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥धृपद॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामे ॥२॥
तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेवू पायी संतांचिये ॥३॥

अर्थ :
ज्या दिवशी मला हरीभक्त भेटतील तोच दिवस माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी सारखा आहे. ज्या दिवशी मला सखे हरीजण भेटतील त्या दिवशी मला अनेक पुण्याच्या राशी जोडल्या जातील आणि त्या सुखाला अंत:पारही राहणार नाही व त्या सुखाची सर इतर कोणत्याही सुखाला देता येणार नाही. आज मला सखे हरीजण भेटले त्यामुळे आजचा दिवस सोन्याचा झाला आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या वाणीला देखील रामनामाचे पीक भरपूर आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या या उपकारातून कसा काय उत्तीर्ण होऊ शकतो परंतू मी माझा जीव त्यांच्या पायावर ठेवू शकतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग