कवडी कवडी घाली खांचे
3045.
कवडी कवडी घाली खांचे । नित्य नूतन भिक्षा वाचे ॥१॥
अतिथासी दान । तेंतों स्वप्नीं नाही जाण ॥२॥
पर्वकळ विधी । न कळे अभाग्यासी कधी ॥३॥
ठेवुनी चित्त धनावरी । सवेंचि फिरे घरोघरी ॥४॥
जन्मा येवोनि अघोर । एका जनार्दनी भोगिती पामर ॥५॥
