बाइलेआधीन होय ज्याचे
3026.
बाइलेआधीन होय ज्याचे जिणें । तया अधमा नरकीं पेणे ॥१॥
बाईल मनोगतें ऐसा चाले । नावडती कोणाचे तया बोल ॥२॥
बाईल देवाचाही देव । ऐसा ज्याचा दृढ भाव ॥३॥
एका जनार्दनी म्हणे मूढाला । बाइलेने भुलविला ॥४॥