मी माझे आणि तुझे । ट
3012.
मी माझे आणि तुझे । टाकी परतें हे वोझे । नामे पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडी ॥१॥
नको गुंतू या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥
देई टाकुनी लवलाही । रामनाम सुखें गाईं । एका जनार्दना पायी । तरी सुखा काय उणें ॥३॥
