न कळे ब्रम्हज्ञान आच
3032.
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्रीपोटी तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचे ॥धृपद॥
द्रव्यइच्छेसाठी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
पोट पोसावया तोंडे बडबडी । नाही धडफुडी एक गोष्टी ॥३॥
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्ये ॥४॥
अर्थ :
आचार विचार ब्रम्हज्ञान काय आहे हेच मात्र कळत नाही परंतू खोटा व्यवहार तर करतो, अशा या चांडाळाचा जन्म गाढवीनीच्या पोटी झालेला असतो त्यामुळे त्याचे नांव महाखर असे असते. द्रव्याच्या प्राप्तीसाठी, द्रव्याच्या इच्छेसाठी तो हरीकथा करतो अशा पापिष्ठाला अन्न खायला मिळत नाही काय ? असा हा चांडाळ पोट पोसण्याकरता तोंडाने व्यर्थ बडबड करतो परंतू त्याची एक गोष्ट सुध्दा धडाची नसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भांड, अशा लबाड मनुष्य ज्याला ब्रम्हज्ञान कळत नाही, आचारविचार कळत नाही धनाकरता जो हरीकथा करतो अशा पापिष्ठ माणसाला त्याच्या रांड आईने जन्मच का दिला असेल ?
