आरती ज्ञानदेवाची.
2284.
आरती ज्ञानदेवाची.
इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास | विश्व तारावया लक्ष्मीनिवास |
ज्ञानेश्वररूपे धरिळे निजवेष | वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश ॥१॥
जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा | जीवाशिवाचा आदि परब्रह्म ठेवा ॥ धृ॥
कृष्ण एकादेशी कार्तिकमासी | आपण पंढरिनाथ सनकादिकांसी |
यात्रेसी येताती स्वानंदू राशी | दर्शन घडे तया निजमुक्ती देसी ॥1२॥
म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा | प्रतिष्ठानी गर्वे हरिला विप्रांचा|
विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा | प्रत्यक्ष द्वारी शोभे पिपळ कनकाचा |॥३॥
सनकसिद्धगणामाजी तू श्रेष्ठ | ज्ञानावरी माजी ज्ञानवरिष्ठ |
अनुताप दीप्ति विश्व घनदाट | नामयांवरी लोटे प्रेमाचा लोंट ॥४॥
