सदगुरु तोचि जाण । जो
2299.
सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥
जेणे देहत्रय निरसिले । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केले । त्यासी वेळ नाही ॥२॥
निराकार निरामय । निर्भय ते अद्वय । तयामाजीं लिंगदेह । मरुनियां गेले ॥३॥
एका जनार्दनी प्राप्ती । जै लिंगदेहाची होय शांती । मग सायुज्यमुक्ति । पाया लागे ॥४॥
