नको आता पुसो काही ।
2300.
नको आता पुसो काही । लवलाही उसंती ॥१॥
जाय वेगी पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥धृपद॥
वचनाचा न करी गोवा । रिघे देवासी शरण ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
अर्थ :
तु आता जास्त काही विचारू नकोस लवकर आवर. तो पांडुरंग दिनाचा सोयरा आहे त्यामुळे तु लवकर पंढरपूरला जावे. तु जास्त काही बोलण्याच्या नादाला लागू नको तु देवाला शरण लवकर जा. तुकाराम महाराज म्हणतात त्या कृपावंत पांडुरंगाला दीन जणांची खूप चिंता आहे.
