प्रीति नाही राया वर्
2290.
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालो तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥धृपद॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥२॥
बत्तर खोडी परी देवमण कंठी । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
अर्थ :
बलाढ्य राजाने आपल्या पत्नीचा त्याग जरी केला तरी तिची सत्ता जगावर चालतेच. त्याप्रमाणे दंभाने का होईना परंतु मी तुझा भक्त झालो आहे देवा त्यामुळे यमदूत माझ्याकडे पाहणार सुद्धा नाहीत. राजाचा पुत्र अपराधी जरी असला तरी त्याला इतर लोक दंड करू शकतील काय? तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या घोड्याच्या ठिकाणी बहात्तर खोडा असुद्या, परंतु कंठामध्ये एक देव मनी (देव मनी म्हणजे गळ्यावर केसांचा भवरा)असला तरी तो सुलक्षणी समजला जातो त्याप्रमाणे देवा माझ्या अंगी कितीही दोष असले, मी कितीही दांभिक असलो तरी मी तुझा भक्त आहे त्यामुळे मी ही चांगलाच समजला जात आहे.
