वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्माज्ञानाचा क्षण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086260 · अभंग क्र. २२९७

2297.
ब्रह्माज्ञानाचा क्षण । विचारी ज्याचे मन । त्याची महत्पापें जळोन । गेलीं स्वये ॥१॥
गंगादि सप्त सागर । पुष्करादि तीर्थे अपार । व्रतादि पवित्र । पर्वकाळ जे ॥२॥
वेदशास्त्र पुराण । त्यासी घडले श्रवण । अश्वमेधादिक यज्ञ । केले जेणे ॥३॥
मेरुसमान सुवर्णीं । अनर्ध्य रत्‍न मेळवोनी । भरुनी दिधली मेदीनी । ब्रह्माणासी ॥४॥
कामधेनुच्या थाटीं । कल्पतरु कोट्यानकोटी । कौस्तुभादि सृष्टी । दिधली तेणे ॥५॥
अमृतासमान । तेणे दिधले अन्न त्रैलोकींचे ब्राह्मण । तृप्त केले ॥६॥
सत्य कैलास वैकुंठ । सत्य पाताळादि श्रेष्ठ । गरुडादि वरिष्ठ । दिधली वहने ॥७॥
ऐसे एक क्षणे प्राप्त । ज्याचे सोहंध्यानीं चित्त । तयासी सुकृत । इतुके जोडे ॥८॥
जो अहोरात्र मनी । ब्रह्माज्ञानीं चिंतनीम । एका जनार्दनी । तोचि वंदा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग