लाजले गे माय आता कोण
2277.
लाजले गे माय आता कोणा ओवाळू | जिकडे पाहावे तिकडे चतुर्भूज गोपाळू ॥१॥
ओवाळू मी गेले माय गेले द्वारके | जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारिखे ॥२॥
ओवाळू मी गेले माय सखिया माजारी | जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज नरनारी ॥३॥
ओवाळू मी गेले माय सारंगधरा | जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज परिवारा ॥४॥
वैजयंती गळा श्रीवत्सलांछन | विष्णुदास नामा येणे दाविली खूण ॥५॥
