ब्रह्माज्ञानालागीं ब
2278.
ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसे । ते तुम्हा आमहं कसे आकळेल ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्मा श्रीरामचंद्र । वसिष्ठ मनींद्र गुरु त्याचा ॥२॥
कृष्णा बळीराम संदीपना शरण । तेणे गुह्मा ज्ञान कथियेले ॥३॥
प्रत्यक्ष वामांकी असोनी पार्वती । वेळोवेळां विनंती करितसे ॥४॥
सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा । सुलभे गौरवा न कळेचि ॥५॥
एका जनार्दनी श्रीगुरुवांचुन । ब्रह्माज्ञान खूण न कळेचि ॥६॥
