वाउगे ते बोल बोलती च
2283.
वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगी नाही ॥१॥
संसारी असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्माज्ञानी विरक्त तो ॥२॥
आकाशमंडळीं रवि तो भ्रमला । परिरांजणीं बिंबला नाथिलाची ॥३॥
एका जनार्दनी प्रसादावांचुनीं । ब्रह्माज्ञान मनी न ठसे कधी ॥४॥
