वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 254. काकड आरती

काकड आरती

🙏 4. संत नामदेव · ABH-083901 · अभंग क्र. २२७९

2279.
काकड आरती

उठा अरुणोदय प्रकाश जहाला | घंटागजर गर्जिन्नला |
हरि चौघडा सुरू जाला | काकड आरति समयाचा ॥१॥
महाद्वारी वैष्णव जन | पूजा सामग्री घेऊन |
आले द्यावे तयासि दर्शन | बंदीजन गर्जती ॥२॥
सभामंडपी कीर्तनघोष | मृदंग टाळ विणे सुरस |
आनंदे गाती हरीचे दास | परम उल्हास करूनिया ॥३॥
चंद्रभागे वाळवंटी | प्रातःस्तानाची जनदाटी |
आता येतिल आपुले भेटी | उठी उठी गोविंदा ॥४॥
ऐसे विनवी रुक्मिणी | जागृत जाहाले चक्रपाणि |
नामा बद्धांजुळी जोडुनी | चरणी माथा ठेवितसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग