वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 251. चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

देवाचे अंचळी उठिला ग

🙏 4. संत नामदेव · ABH-083878 · अभंग क्र. २२७१

2271.
देवाचे अंचळी उठिला गजर । विठ्ठलनामे अंबर गर्जतसे ॥१॥
संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारी ॥३॥
ऐसी आनंदाने नामाच्या गजरी । दिली महाद्वारी समाधि त्या ॥४॥
अस्थि निक्षेपण आपुलीया हाते । करूनि अनंते पाषाण ठेवी ॥५॥
राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओंवाळीत ॥६॥
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओंवाळून ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग