वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

तरी सोहं नव्हे याग ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086164 · अभंग क्र. २३००

2300.
तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥
सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हे ॥२॥
सोहं नव्हे वारा । पंचभूतांचा पसारा । सोहंच्या विचारा । साधु जाणती ॥३॥
एका जनार्दनी । आपण आपणासी जाणणे । साक्षित्व देखणे । तेंचि सोहं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग