भूपाळ्या.
2272.
भूपाळ्या.
उठा उठा प्रभात जाहली | चिता श्रीविठ्ठल माऊली |
दीन जनांची साउली | येई धाउनी स्मरतांची ॥१॥
पंढरपुरी जे भीमातटी | सुंदर मनोहर गोमटी |
दोन्ही कर ठेवोनिया कटी | भेटीसाठी तिष्ठतसे ॥२॥
किरीट कुंडले मंडित | श्रीमुख अति सुंदर शोभत |
गळा वैजयंती डुल्लत | हार मिरवत तुळशीचा ॥३॥
सुरेख मूति सगुण सांवळी | कंठी कौस्तुभ एकावळी |
केशर उटी परिमळ आगळी | बुका भाळी विलसतसे ॥४॥
पीत पीतांबर कसला कटी | अक्षयी वीट चरण तळवटी |
सकळ सौंदर्य सुखाची पेंटी | इंद्रिय संपूष्टी आठवा ते ॥५॥
अति प्रिय आवडे तुळसी बुका | तसीच प्रीति करी भोळ्या भाविका |
नामा पदपंकज पादुका | शिरी मस्तकी वंदितसे ॥६॥
