नाम घेता वाया गेला ।
2273.
नाम घेता वाया गेला । ऐसा कोणे आइकिला ॥१॥
सांगा विनवितो तुम्हासी । संत महंत सिद्ध ॠषी ॥धृपद॥
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
अर्थ :
नाम घेतले म्हणून कोणी वाया गेले असे कोणी ऐकले आहे काय? हे संत, महंत, सिद्ध, ऋषींनो कृपया मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी विनंती करतो. नामाने एखादा तरी तरला नाही असा निवडून मला दाखवावा. तुकाराम महाराज म्हणतात हे संत-महंत, सिद्ध, ऋषी, मुनीहो मी तुमच्याशी जे काही बोललो ते प्रेमाने बोललो आहे तरी माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा करा.
