वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

असोनि कुळींचा हीन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086403 · अभंग क्र. २२९५

2295.
असोनि कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्माज्ञानी । त्यासी तिन्ही देवादि सुरगण । वंदिताती ॥१॥
त्याची मृत्युलोकी सेवा । जयासी घडे सदैवा । मा ब्राह्मण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥
तयासी वस्त्र अन्न । जठर करिती तृप्त जाण । त्यासी वैकुंठादि आंदण । देव देतो ॥३॥
त्यासी जो करी शीतळ । त्यासी पुण्य जोडे सकळ । एका जनार्दना केवळ । तोचि साधु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग