वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तया घडले सकळ नेम । म

🙏 3. संत तुकाराम · ABH-078151 · अभंग क्र. २२७०

2270.
तया घडले सकळ नेम । मुखी विठोबाचे नाम ॥१॥
काही न लगे सिणावे । आणिक वेगळाल्या भावे । वाचे उच्चारावे । रामकृष्णगोविंदा ॥धृपद॥
फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहंळा ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नावे । तोचि होइजे स्वभावे ॥३॥

अर्थ :
ज्याच्या मुखात विठोबाचे नाम सतत राहिल त्याला सर्व प्रकारचे व्रतवैकल्य केल्या सारखेच होईल. यावाचून दुसरे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची साधना करण्याची गरज लागत नाही. केवळ आपल्या वाचेने रामकृष्ण गोविंद या नावाचा उच्चार करावा. असे केल्याने तुम्हाला अलौकिक फळ ते म्हणजे वैकुंठ सोहंळा भोगण्यास मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या मुखाने हरीचे नाम घेईल तो देखील हरिरूप होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग