ऐकोनी कृष्णाचें बोलण
2267.
ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणे । म्हणे कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर ॥१॥
मग धरुनी उद्धवाच्या हात । स्वये दावी श्रीकृष्णानाथ । आणिकांसी नोहे ते प्राप्त । हरिभक्ताविण ॥२॥
देवे देवघर उघडिलें । सन्मुख उद्धवा बैसविले । देव सांगतसे वहिले । तया उद्धवाप्रति ॥३॥
एका जनार्दनी प्रेम । भक्तांचे ऐकता नाम । प्राणी होती निष्काम । अहर्निशी जपतां ॥४॥
