वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 256. विठ्ठल आरती

विठ्ठलाची आरती.

🙏 4. संत नामदेव · ABH-083875 · अभंग क्र. २२८१

2281.
विठ्ठलाची आरती.

युगे अठ्ठाविस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा |रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवून कटी | कासे पीतांबर कस्तुरि लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
आषाढी कार्तिकी भक्‍त जन येती | चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती |
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति | केशवासी नामदेव भावे भोवाळिती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग