निर्गुण निर्विकारु ।
2285.
निर्गुण निर्विकारु । तोचि जगी पै इश्वर ॥१॥
नित्य निर्विकल्प देख । सदा वाहे समाधीसुख ॥२॥
ऐसे ब्रह्माज्ञान जोडे । तै गुरुकृपा तेथे घडें ॥३॥
कापुर घातलीया जळीं । स्वये नुरेची परिमळीं ॥४॥
एकपणे तो एकला । एका जनार्दनी देखिला ॥५॥
