वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 251. चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

चोखामेळ्याच्या समाधी

🙏 4. संत नामदेव · ABH-083877 · अभंग क्र. २२६९

2269.
चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

मंगळवेढयाभोंवते कुसू घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥
महारासमागमे चोखा मेळा गेला । काम ते लागला करावया ॥२॥
सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळा ॥३॥
चार महिने याचि रीतीने लोटिले । कुसू कडाडिले अकस्मात्‌ ॥४॥
तयाखाली महार बहु चूर झाले । चोख्याने अर्पिले प्राण देवा ॥५॥
देव म्हणे नाम्या त्वा जावे तेथे । त्याच्या अस्थि येथे घेऊनि याव्या ॥६॥
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठलनाम जयामध्ये निघे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग