विष्णुदासा घरे ब्रह्
2293.
विष्णुदासा घरे ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळे घ्या घ्या कोणी ॥१॥
आरुषे सावडे नाम मुखी जया । ब्रह्माज्ञान तया विनवितसे ॥२॥
माझा अंगिकार करा संतजन । ऐसे ब्रह्माज्ञन कींव भाकी ॥३॥
एक जनार्दनी संताचे चरणी । होउनी दीन वदनी कींव भाकी ॥४॥
