वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

सोहं नव्हे नाद । कर्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086311 · अभंग क्र. २३०१

2301.
सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष भूमध्य । नव्हे सोहं ॥१॥
चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा । यासी जाणे अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥
अधिष्ठानीं सहाशे जप । स्वाधिष्ठांनी सहाशंजप तितुके वोळखा निःशेष मणीपुरीं ॥३॥
अनुहातीं सहस्त्र । विशुद्ध अग्नी चक्र सहस्त्र । तीन ठायी तीन सहस्त्र । जप होय ॥४॥
एकवीस सहस्त्र साशत । हे अवघेचि मारुत । त्यासी सोहं म्हणत । ते नाडिले ॥५॥
एका जनार्दनी । सोहं नाहे पवन । पवनाचें वर्तन । सोहं सत्ता ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग