ब्रह्माज्ञानासाठीं ।
2282.
ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती पाठोपाठी ॥१॥
नोहे नोहें बा फुकांचें । बोल बोलता नये सांचे ॥२॥
ऐसे आहे तैसे आहे । वाउगा तो भ्रम पाहे ॥३॥
जनार्दन कृपा पुर्ण । तैंचि कळे ब्रह्माज्ञान ॥४॥
एका जनार्दनी शरण । चालुन येईल ब्रह्माज्ञान ॥५॥
