वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

शरण आले त्यासी नेदाव

🙏 3. संत तुकाराम · ABH-078023 · अभंग क्र. २२८८

2288.
शरण आले त्यासी नेदावी हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावे परिसा हरी विज्ञापना ॥धृपद॥
गांजिलियाचे करावे धावणे । विनंती नारायणे परिसावी हे ॥२॥
भागलियाचा होई रे विसावा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥
अंकिताचा भार वागवावा माथा । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥
तुका म्हणे आम्हा विसरावे ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥

अर्थ :
हे जगजेठी तुम्हाला शरण आलेल्या भक्तांकडे तुम्ही पाठ फिरऊ नका एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे हरी तुम्हाला जे भक्त आळवित असतील त्यांना तुम्ही पटकन उत्तर द्यावे एवढीच माझी विज्ञापना म्हणजे विनंती आहे. हे नारायणा जे गांजलेले आहेत दुःखाने त्रस्त झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जावे ही तुम्हाला विनंती आहे. हे केशवा दमलेल्या भागलेल्या लोकांचा तु विसावा हो एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे अनंता तुला अंकित झालेल्या दासांचा योगाक्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर वागावा एवढी विनंती माझी ऐका. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा तु आम्हाला म्हणजेच तुला शरण आलेल्या, तुला आळवणाऱ्या, दुःखाने त्रस्त असणाऱ्या, दमलेल्या, भागलेल्या तुझ्या अंकित दासांना कधीही विसरू नये एवढी माझी विनंती ऐक.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग