वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 258. संतांची आरती

क्षार उदक देउनी मधुर

🙏 4. संत नामदेव · ABH-083906 · अभंग क्र. २२८३

2283.
क्षार उदक देउनी मधुरता आली | तैसी लवणस्थिति अमृत खोली |
तयांच्या अंतरी प्रवृत्ती मुराली | परी साखरेची मौल्यता कवणे आणिली ॥१॥
जयजय आरती प्रेमसिंधुपुरा | ऐक्या ऐक्य केले तुवा येकसरा ॥ धृ॥
नित्य प्रेमे जागती जागरणी जागा | आणिक उद्धरण जगासी सांगा |
येकि एकादशी पुण्य आले ते पाहा गा | द्वादशी लाधली ते भक्तासी मागा ॥२॥
ऐसे परउपकारी लोळावे त्यांचे द्वारी | तेचि केशवध्यान येर लटिके संसारी |
त्यांचे रंगणींची शिळा देवा मज करी | नाही तरी व्यर्थ जन्मोनि पशुपरी ॥३॥
पुर्वज उद्धरण दिसे वैकुंठ वाटे | हरिदासांचे भार मिरवती गरुडटके गोमटे |
धन्य तृप्तीतीर बरवे वाळुवंटे | वैष्णव रंगी नाचती हर्ष बहु वाटे ॥४॥
लाधलो समसुख काशीये जाता | विश्‍वनाथ प्रेम प्रेमाचिया सत्ता |
बाणली वीरश्री पंढरिनाथा | जिकडे तिकडे देख हरिदास गर्जता ॥५॥
निवृत्ति सोपान हे ज्ञानेदवरू | चांगदेव मुक्ताई वटेश्वरू |
अवघिया अवघा साक्षात्कारू | सद्गुरु जाण तो विसोबा खेचरू ॥६॥
त्याचे चरणींचा रजरेणु हा नामदेव शिपा | पाहता अनुभव सकळार्थ सोपा |
विठ्ठलकृपेस्तव यांची मजवरी कृपा | हे एकचि मूर्ती पावलो ऐसे देखो पा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग