वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

वर्म जाणे तो विरळा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086323 · अभंग क्र. २२८६

2286.
वर्म जाणे तो विरळा । तयांचीं लक्षणे पै सोळा । देही देव पाहे डोळा । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥
जन निंदो अथवा वंदो । जया नाही भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगी न बाणती ॥२॥
कार्य कारण कर्तव्यता । हे पिसे नाही सर्वथा । उन्मनी समाधी अवस्था । न मोडे जयाची ॥३॥
कर्म अकर्मचा ताठा । न बाणेचि अंगी वोखटा । वाउग्या त्या चेष्टा । करीना कांही ॥४॥
शरण एका जनार्दनी । तोचि एक ब्रह्माज्ञानी । तयाचे दरुशनी । प्राणियासी उद्धार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग