भावना अभावना निमाली
2290.
भावना अभावना निमाली अंतरी । वाया हावभरी नाही मन ॥१॥
कामक्रोध ज्याचे दमोनियां गेले । इंद्रियें समरसलीं एके ठायी ॥२॥
एकपणे सर्व होऊनियां मेळा । रतलें गोपाळाचरणीं मन ॥३॥
तोचि ब्रह्माज्ञानी जगामाजीं धन्य । एका जनार्दनी चरण वंदी ॥४॥
